#जीवन-यात्रा.
घंटोंशी ते बोलत बसणे ,विषय असो वा तो ही नसो
नव्या नव्या त्या नात्यामध्ये भला बहाणा असो नसो
बघता बघता अनुरक्तीने लिंपित झालो परोपरी नवथरतेचे दिस सराले स्थिरावलो मग संसारी ॥
सरावले मग नाते जेव्हा वेळ जणु वैरी झाला
कधी कुठे न् कसां मिळेना दोघांमध्ये रमण्याला
कुटुंब-करियर आणि समाजही वेळेचे हो वाटेकरी
उगाच सबबी सांगत सुटता बंध मुळचे अस्वस्थ जरी ॥
हळुहळू मग प्रतिमा मोठी झाली प्रत्यक्षाहुनी थोर
तिलाच जपण्या गेला अवघा नात्यांचाही हा तोल ॥
गोड गोजिरे पहिले सारे पलटुनी गेले बघता बघता
कर्तृत्वाच्या प्रतापमृगजळी भाग्याने डाव साधला॥
वळूनि बघता जीवनपथ जो रम्य हवासा कधी वाटे
कितेक मोती आणिक रत्ने व्यर्थ दवडली इति भासे
काय कमविले ,काय गमविले विचार करता भय दाटे
शून्यातून या जगती आलो ,रमूनि ,परतुया शून्याते ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:
Post a Comment