#वेदना .
जननी आहे सर्जनाची
वेदना , सहना मनाची
सत्य सुंदर मंगलाची
घुसमटीतून मानवाची ॥१॥
बोलणारे बोलो भले ते ;
अंतरीच्या तळतळाटे
आर्ततेने काळीज फाटे
त्यांना विचारा काय वाटे ?॥२॥
शिल्पे असो वा शब्दचित्रे
कि संस्कृतीची स्मरणपत्रे
मुखवटे ते लपविण्याचे
त्या त्या क्षणीच्या वेदनांचे ॥३॥
संवेदना ही ज्यांना कळाली
शिल्प-काव्याआड दडली;
त्यांना उमजले या जगी
परिपूर्ण जीवन मानवी ॥૪॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment