#शब्दचिंतन.
कधी कधी नेहमी वापरात असलेल्या शब्दाचा 'अर्थ' अवचित, विनासायास कळतो आणि मनाला खूप आनंद होतो.
असंच काहीसे झाले, थोड्या वेळापूर्वी.
तरुण म्हणजे तरुण, युवक,जवान, म्हातारा नसलेला, बालक नसलेला वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हा शब्द सर्वांना परिचित आहेच.
शब्दकोष धुंडाळताना अचानक या शब्दाची व्युत्पत्ती गवसली.
तरुण= तरति /प्लवते प्रमोदसलिले इति!
प्रमोदसलीलात म्हणजे आनंदाच्या डोही (पाण्यात) तरंगणारा म्हणजे तरुण!!
जो कायम हर्षित, सुखात, प्रेमात आल्हादीत, आमोदीत राहतो, तो तरुण.
वयाने युवा असून कायम दुर्मुखलेले "तरुण" नाहीतच.
उलट वय उलटून गेल्यावरही कायम हसतमुख, दिलखुलास जगणारे "तरुण" ठरतात.
म्हणजे 'तरुण' हा शब्द शारीरिक वय दर्शविणारा नसून मनोभूमिका दर्शक शब्द आहे.
तुमचे काय मत आहे?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
खूप छान
ReplyDeleteधन्यवाद 🙏
DeleteVery true and correct assessment
ReplyDeleteThank you. 🙏
Deleteअगदी योग्य...
ReplyDeleteधन्यवाद 🙏
ReplyDeleteसमर्पक
ReplyDeleteधन्यवाद
Deleteतरुण असणाऱ्या करीता मनाला अवर्ण आवश्यक आहे
ReplyDeleteम्हणजे?
Deleteनक्कीच
ReplyDelete✅✅✅
Deleteअगदी बरोबर
ReplyDelete✅✅🌹🙏
Deleteअगदी बरोबर,खूप छान!
ReplyDelete🙏🌹✅
Deleteखरं आहे. मन तरुण तर शरीर तरुण व निरोगीही..
ReplyDelete🙏🌹✅
Delete🙏🌹🙏
DeleteCorrect आहे. 👍
ReplyDelete🙏
Deleteखूप छान, मनाचे तारुण्य हे जीवनाला अर्थ देत.
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद
Delete