Wednesday, January 8, 2025

#सहजोक्त.

 #शब्दचिंतन.

कधी कधी नेहमी वापरात असलेल्या शब्दाचा 'अर्थ' अवचित, विनासायास कळतो आणि मनाला खूप आनंद होतो.

असंच काहीसे झाले, थोड्या वेळापूर्वी.

तरुण म्हणजे तरुण, युवक,जवान, म्हातारा नसलेला, बालक नसलेला वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हा शब्द सर्वांना परिचित आहेच.

शब्दकोष धुंडाळताना  अचानक या शब्दाची व्युत्पत्ती गवसली.

तरुण= तरति /प्लवते प्रमोदसलिले इति! 

प्रमोदसलीलात म्हणजे आनंदाच्या डोही (पाण्यात)  तरंगणारा म्हणजे तरुण!!   

 जो कायम  हर्षित, सुखात, प्रेमात आल्हादीत, आमोदीत राहतो, तो तरुण. 

वयाने युवा असून कायम दुर्मुखलेले "तरुण" नाहीतच. 

उलट  वय उलटून गेल्यावरही कायम हसतमुख, दिलखुलास जगणारे "तरुण" ठरतात.

      म्हणजे 'तरुण' हा शब्द शारीरिक वय दर्शविणारा नसून मनोभूमिका दर्शक शब्द आहे. 

तुमचे काय मत आहे? 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

24 comments:

  1. खूप छान

    ReplyDelete
  2. Very true and correct assessment

    ReplyDelete
  3. अगदी योग्य...

    ReplyDelete
  4. समर्पक

    ReplyDelete
  5. तरुण असणाऱ्या करीता मनाला अवर्ण आवश्यक आहे

    ReplyDelete
  6. नक्कीच

    ReplyDelete
  7. अगदी बरोबर

    ReplyDelete
  8. अगदी बरोबर,खूप छान!

    ReplyDelete
  9. खरं आहे. मन तरुण तर शरीर तरुण व निरोगीही..

    ReplyDelete
  10. Correct आहे. 👍

    ReplyDelete
  11. खूप छान, मनाचे तारुण्य हे जीवनाला अर्थ देत.

    ReplyDelete