Saturday, February 8, 2025

#सहजोक्त

 #शब्दचिंतन-अलग 

भाषेचीही गंमत असते. एखादा शब्द कानी पडला की "तो अमुक अमुक भाषेचाच आहे, मग आपल्या भाषेत तो वापरता कामा नये" , असे अस्मितेचे फतवे निघू लागतात. शब्दाचे मूळ विचारात घेतल्याच जात नाही. असो.


'अलग' शब्द हिंदीच आहे, असे अनेकांना वाटते. कारण बॉलिवूड गाण्यात असतो हा शब्द. आमच्या नागपुरी बोलीत 'अल्लग' म्हणतात. पण हा शब्द खरोखर 'हिंदी' आहे कां? 

 विलग, लग्न, संलग्न, लागणे, लगडणे इत्यादी शब्द मराठीत आहेत, होय ना? 

मराठीत जे जे शब्द आहेत, त्यातील कित्तेक शब्द तत्सम (संस्कृत मधून जसेच्या तसे घेतलेले ),  तद्भव (संस्कृत मधून घेताना जरा बदल केलेले ) असतात.  

आता याच शब्दांचे बघा.  संस्कृत "लग्" धातू, पहिला गण, परस्मैपद.  असा हा मूळधातू.  त्याचे, चिकटणे , जुळणे, संग असणे इत्यादी अर्थ होतात.

 आता या धातूपासून  कृदंत, क्रियापदे तयार होतात. जसे 

लग्न >>जुळणार आलेले.

संलग्न >> सम्यक रित्या जुळलेले.

विलग >> वेगळे झालेले.

अलग >> न जुळलेले.

लागणे >> वाक्य =झाडाला फुले लागली. 

( इथे लागणे म्हणजे, फांदीला जुळली, उगवून चिकटली , असे अर्थ होतात.) 

लगडणे >> खूप प्रमाणात लागणे, असा अर्थ होतो. 


मग, अलग शब्द मराठीत चालणार नाही कां? 

तत्सम शब्द मराठीत योजला तर बिघडले कुठे? 


तत्सम शब्दांना मराठीपासून विलग न करता, मराठी वाक्यात संलग्न करून घ्यावे. मराठीला अलग करू नये. तत्सम शब्द लागले तर हरकत काय? भाषेत तत्सम शब्द लगडू द्या की? नाही कां?

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

नागपूर.

14 comments:

  1. Replies
    1. तुमच्या प्रत्येक पोष्टमधून सखोल ज्ञान मिळतं मॅडम! खूप छान!!

      Delete
    2. जगदंब. वा प्रज्ञाजी नावाप्रमाणेच सार्थ आहात आपण. सुंदर चिंतन.वेदशाळा मातापुर माहूरगड

      Delete
    3. 🙏🙏🙏🙏आशीर्वाद द्यावा 🙏🙏

      Delete
  2. अगदी बरोबर बोललेत तुम्ही नावासारख्याच प्रगल्भ आहात. तुमच्या प्रत्येक लेखातून आम्हाला खूप ज्ञान मिळत राहते. मी तर प्रत्येक लेख खूप खूप समरसून वाचते आणि समजून घेण्याचा प्रयत्न करते तशीही तुमची भाषा ही सर्वांना समजेल अशीच असते.

    ReplyDelete
  3. Beautiful content

    ReplyDelete
  4. खुप सुंदर 👌👌

    ReplyDelete
  5. आपल्या भाषेत असलेले शब्द संस्कृत वर आधारित आहेत यांचा शास्त्रीय पुरावा दिल्या बद्दल आभार। हल्ली संस्कृत म्हणजे संस्करण केलेली (अर्थात उच्चारांपासून शब्द आणि वाक्य रचने पर्यंत नियम बद्ध केलेली) असे म्हटले तरी ते स्वीकार करण्यात नवीन पिढीला संकोच होतो आणि ही फक्त विशिष्ट वर्गाची भाषा किंवा मृत भाषा समजण्या पर्यंत मजल जाते. आपण यावर प्रकाश टाकल्यास बद्दल आभार.

    ReplyDelete

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...