Tuesday, September 23, 2025

रेणुका मातेचे पद

 🙏तिसरी माळ 24/09/2025 बुधवार 🙏

पद

ये ग सावळे अंबाबाई ग ।

 माझे आई रेणुके ॥ 

जवळ नसे मृगराज तुझ्या तरी । 

धांवत ये पायी पायी ग ॥1|| माझे०

 ही वेळ स्वस्थचि नसे बसण्याची । 

येण्याची कर घाइ घाइ ग ॥ २ ॥

 होताती व्याकुळ प्राण तुझ्याविण । 

भेट मला देई देई ग ॥ माझे ३ ॥ 

विष्णुदास म्हणे रक्षुनिया दीन ।

 सुकृत यश घेई घेई ग ॥ माझे० ४ ॥

आज 👆हे एक छोटेसे पद घेऊ या. 

रेणुका आणि विष्णुदास यांचे मायलेकराचे नाते आहे. 

ये ग सावळे अंबाबाई ग ।

 माझे आई रेणुके ॥

आपल्या सावळ्या आईला बोलावताना, विष्णुदास म्हणतात 'अंबा, जगदंबा, रेणुका, तू ये'. आपल्या मातीतून निघालेला अस्सल रंग सावळाच आहे.  सावळा रंग, मिरविण्यासारखा भूषणास्पद आहे, खचितच. कारण कृष्ण सावळा, राम सावळा, द्रौपदी सावळी च होती. सावळ्या रंगाचे कौतुकही होत असे तेव्हा. जसे की, "गोधूमवर्ण तीचा, हरिणाच्या पडसापरी डोळे", "सावळाची रंग तुझा पावसाळी नभापरी"   सावळ्या रंगाचे कौतुक करणारे मराठी-मन कधी गोऱ्या रंगला भुलले आणि फेअर अँड लव्हलीच्या मागे वेडे झाले व सावळ्या रंगला हिणवू लागले, कळेना? असो.


जवळ नसे मृगराज तुझ्या तरी । 

धांवत ये पायी पायी ग ॥1|| माझे०

आई हे हक्क गाजवायचे सनातन स्थान आहे. म्हणूनच विष्णुदास म्हणतात, तुझ्या जवळ तुझे वाहन मृगराज सिंह नसेल तर पायी पायी धावत ये, पण  तू येच.  


ही वेळ स्वस्थचि नसे बसण्याची । 

येण्याची कर घाइ घाइ ग ॥ २ ॥

जगाचा पसारा चालविणारी जगदंबा रेणुका, विष्णुदासांची विनवणी ऐकूनही अजूनही आली नाही. म्हणून ते म्हणतात, ही वेळ स्वस्थ बसायची नाही. तू घाई कर, सत्वर ये.

'आईला काही गांभीर्य कळतच नाही' असे सर्वच मुलांना वाटते, याला विष्णुदासही अपवाद नाही. 


होताती व्याकुळ प्राण तुझ्याविण । 

भेट मला देई देई ग ॥ माझे ३ ॥

माझे पंचप्राण, तुझ्या अनुपस्थितीमुळे व्याकुळ झाले आहेत. तू येऊन भेट ना ग आई, लवकर भेट दे. 


आई ही 'देव' कां असते? जन्म तर देतेच शिवाय तिच्या जीवितेपर्यंत अभय देत असतें. 'अपत्याला भयमुक्त करणे', या एका गुणामुळे आई देव ठरते. 



विष्णुदास म्हणे रक्षुनिया दीन ।

 सुकृत यश घेई घेई ग ॥

मी दीन दुबळा तुझा पुत्र, मला तू सांभाळ, माझं रक्षण कर. आपल्या कमकुवत अपत्यांना तू नीट सांभाळते, राखते असे तुला यश लाभो. 


आजचे पद जरा छोटे पण आईच्या बद्दलचा मुलाचा अनुबंध दर्शविणारे आहे.  

आजचे पद वाचून मला प्रसून जोशी लिखित हे फिल्मी गीत आठवले. 

मैं कभी बतलाता नही, 

पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ 

यूँ तो मैं दिखलाता नही, 

तेरी परवाह करता हूँ मैं माँ 

तुझे सब है पता, है ना माँ 

तुझे सब है पता मेरी माँ

भीड़ में यूँ ना छोड़ो मुझे, 

घर लौट के भी आना पाऊ माँ

भेज ना इतना दूर मुझको तू,

 याद भी तुझको आना पाऊ माँ  

क्या इतना बुरा हूँ मैं माँ

©डॉ. प्रज्ञा देशपांडे

नागपूर.

👆👆कृपया लेख वाचून कॉमेंट करा.

18 comments:

  1. Narayanan Devarajan GandikotaSeptember 23, 2025 at 5:58 PM

    अद्भुत अकल्पनीय, सुंदर अभिव्यक्ति, माँ बेटे का नाता जग में सर्वोपरि, अहोभाव

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ प्रज्ञा देशपांडेSeptember 23, 2025 at 6:58 PM

      धन्यवाद 🙏🙏🙏दादा

      Delete
    2. अतिशय सुरेख माहिती सादर ..अप्रतिम

      Delete
    3. डॉ प्रज्ञा देशपांडेSeptember 23, 2025 at 8:26 PM

      धन्यवाद

      Delete
    4. गोऱ्या वर्णाचा अटटहास नकोच .. मूल कसंही असू देत काळ किंवा गोरं, बुद्धीमान किंवा बुद्धीने थोडं कमी.....आईची त्यावर असलेली माया कधीही कमी होत नाही... तसंच आई ही कुठल्याही वर्णाची असली तरी आई ती आईच तिच्या कुशीत शिरून जो आनंद मिळतो तो अवर्ण्य आहे.
      आणि ही तर जगतजननी ती tr साऱ्यांचीच माय माऊली आहे. तिच्या मायेत कुठलीच विषमता येऊ शकत नाही.

      Delete
    5. डॉ प्रज्ञा देशपांडेSeptember 24, 2025 at 9:24 PM

      ✅✅✅✅🙏

      Delete
  2. अतिशय सुंदर व सोप्या शब्दात आई व बाळा च नात दर्शविणार...जगतजननी आई ला मुलाची करून व. प्रेमळ हाक..अद्भुत

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ. प्रज्ञा देशपांडेSeptember 23, 2025 at 6:59 PM

      धन्यवाद 🙏

      Delete
  3. राज्यकर्ते इंग्रज गौर वर्णीय होते. त्यामुळे गोरा रंग श्रेष्ठत्वाचे प्रतिक ठरला. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आई-मुलाचे नाते आम्ही जाणतो फक्त समजून घेत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ. प्रज्ञा देशपांडेSeptember 23, 2025 at 7:00 PM

      खरंय ✅,.

      Delete
  4. राज्यकर्ते इंग्रज... लेखक आनंद सहस्रबुद्धे.

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ. प्रज्ञा देशपांडेSeptember 23, 2025 at 7:00 PM

      धन्यवाद, सर 🙏🙏

      Delete
  5. Replies
    1. डॉ प्रज्ञा देशपांडेSeptember 23, 2025 at 8:25 PM

      धन्यवाद 🙏

      Delete
  6. विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी
    कृष्णमूर्ती बहुकाळी हो माय
    रात्र काळी घागर काळी, यमुना जळेही काळी हो माय।

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ प्रज्ञा देशपांडेSeptember 24, 2025 at 12:09 AM

      🙏🙏✅✅ धन्यवाद

      Delete
  7. सुरेख लिहिले आहे

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ प्रज्ञा देशपांडेSeptember 24, 2025 at 12:10 AM

      धन्यवाद

      Delete

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...