🙏🙏सातवी माळ 28/09/2025🙏🙏
अभंग
अभंग अक्षरवृत्त आहे, यालाच छंद असेही म्हणतात.
छंद म्हणून अभंगाचे दोन प्रमुख प्रकार पडतात. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग.
मोठा अभंग= प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात. पहिल्या तीन खंडांत प्रत्येकी सहा अक्षरे असतात. तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात.
दुसऱ्या व तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळविलेले असते.
तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो.
उदा०
सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।।
कर कटेवरी । ठेवोनिया ।।
लहान अभंग= प्रत्येकी आठ अक्षरांचे दोन चरणखंड असतात.
व शेवटी यमक जुळवलेले असते.
उदा०
जे का रंजले गांजले ।
त्यांसी म्हणे जो आपुले ।।
अभंग रचनेत अक्षरसंख्येचे बंधन नेहमीच काटेकोरपणे पाळले जाते असे नाही. उच्चारानुसार कमीजास्त अक्षरेही वापरली जातात, हे या छंदाचे वैशिष्ट्य आहे.
"अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची" ही उक्ती प्रसिद्ध आहे.
विष्णुदासांनी "अभंग रचना" देखील केली आहे.
आज जे उदाहरण पाहू ते, लहान अभंग या प्रकारातील आहे.
नित्य मातृतीर्थी स्नान। नित्य रेणुकादर्शन ॥ १ ॥
आदिमाये तुजपाशी। सर्वदेव तीर्थे काशी ॥ २ ॥
उजळोनी ज्ञानज्योती नित्य ओवाळू आरती ॥ ३ ॥
करु तीर्थामृतपान। हेची जप तप ध्यान ॥ ४ ॥
करू त्रिकाळ वंदन । तोडू यमाचे बंधन ॥ ५ ॥
करु नित्य प्रदक्षिणा। तन, मन, धन दक्षिणा ।। ६॥
तुझ्या बसोनी द्वारात । गुण गाऊ दिन रात ॥ ७॥
नित्य पाहु तुझे मुख। हेचि आम्हा ब्रम्हसुख ।। ८।।
नित्य विष्णुदास म्हणे । कृपा लोभ असू देणे ।।९।।
लहान अभंग असल्यामुळे आठ -आठ अक्षरांचे दोन चरण (म्हणजे ओळी ) आहेत. दोन्ही चरणात यमक साधले आहे. जसे स्नान-दर्शन, पाशी -काशी, ज्योती -आरती, पान-ध्यान इत्यादी
अर्थच्या दृष्टीने अत्यंत सोपा असल्यामुळे वेगळ्या स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही.
वर्ण्य विषय रेणुका, हा एकच ठेवूनही एकसुरीपणा नसणे, ही विष्णुदासांच्या रचनेची खासियत आहे, हे नक्की.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर
लेख पूर्ण वाचून झाला की कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट नक्की करा, कृपया.
आणि तुम्हाला माझे ब्लॉग लेखन आवडत असेल तर माझ्या नावसह ही link शेयर करायला विसरू नका. 😊
सुरेख अभंगात बरोबरच अभंग या काव्यप्रकाराची रंजक माहिती. त्याबरोबरच संस्कृत आणि मराठी छंद प्रकारातील साम्य
ReplyDeleteआणि भेद ही समजला. प्रज्ञाबाईं चे लिखाण ज्ञानवर्धक असते
🙏🙏🙏धन्यवाद
Deleteसुरेख
ReplyDelete🌹🌹धन्यवाद
Deleteधन्यवाद
Deleteखूप छान लेखन ताई...नेहमीप्रमाणेच...वैविध्यपूर्ण...
ReplyDeleteधन्यवाद
DeleteKhup chan
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूप छान
ReplyDelete