Sunday, July 23, 2017

#सहजोक्त

#सहजोक्त.
ययातीचे वंशज.

संयम-नियम उरतात सारे शब्दात फक्त
मोह-मायाचे जंजाळ सुटता सुटत नाही.॥

उतार वयातही लवकर उतरत नाही
जवानीच्या जोशाचे हँगोव्हर सरता सरत नाही.॥

पहावे  तिकडे व्यापून आहे
तारुण्याच्या ज्वाळा
नवतरूणांनाही लाजवतात  या तारूण्यकळा ॥

विज्ञानयुगाने वाढविलेत ययातीचे वंशज
तारुण्य जपण्यात जो तो सजग ॥
 अनुभवाने आता केसही पिकत नाहीत.
प्रगल्भता तर कोर्स करूनही मिळत नाही ॥

सारी कडे नुसता जवानीचा जल्लोश
संस्कारानेच संभाळावा स्वत:चा होश ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर.





No comments:

Post a Comment

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...