#सहजोक्त
आज तंत्रज्ञानक्रांतीमुळे जग जवळ आलय .
हो खरय.कितीतरी अपरिचित या तंत्रस्नेहामुळे चिरपरिचित झालेत.
पूर्वी लेख/निबंध/कविता/इत्यादी लिहिले की नियतकालिकातात द्या, ते छापतील की परत पाठवतील वाट बघा.असा सगळा "धीर धरी" कार्यक्रम. आलं काही छापून की कोण आनंद !
आता सट्ट लिहा पट्ट पोस्टा.... सोशलच झालाय मिडिया.लई सोस त्याला जग जोडायचा,अभिव्यक्ती जपण्याचा...
आता सगळ्या जगालाच वेगाचे वेड लागलेय. गाड्या/वाहने/नेटस्पीड/वागणे /बोलणे/मैत्री करणे/तोडणे .........सगळं वेगात / आवेगात .
ज्याला त्याला शिखर/कळस गाठायची घाई.जो तो टोक/शिखर/कळस गाठायचीच वाट बघतो.
यशच हवे ,अपयश नकोच . अपयश पचवायची ताकद या वेगवान घोडदौडीत संपलीय.
जग जवळ आलं ते ही आभासी.ना त्यात प्राण-रस-रूप-गंध ,पंचज्ञानेंद्रिय निववणारे सामर्थ्य ना समाधान.
"बोलाचीच (लिहायची)कढी न् बोलाचाच (लिहायचा) भात"!
लहान-मोठा ,स्त्री-पुरुष ,गरीब-श्रीमंत ,जवळ-दूर सारे भेद अभेद झाले,समता-समानता आली. छानच.
वास्तवात प्रतंयेकाच्या मनात "स्वतंत्र विश्व" तयार झालय.व्यक्तिस्वातंत्र्याची व्याप्ती इतकी मोठी झाली की जगद्व्याळ.
चालायचेच .
पूर्वी वेळ होता ,पैसा नव्हता.हायफायसुख नव्हते. आज सार आहे पण वेळ नाहीय. आभास जास्त भावतो वास्तवाला भेदायची शक्तीच नाही.
कालाय तस्मै नम:!!
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

No comments:
Post a Comment