#सहजोक्त.
कालच्या उच्चांकाचा सतत ढिंडोरा पिटवून उद्याचा फायदा करून घ्यावा हे मला जमलेच नाही॥
सर्वांशी मनापासून समतेने वागण्यामुळे अनेक चढेल झालेत हे कळतं पण माझा स्वभाव नाही वळत॥
सगळ्यांना भावनिक जपताना कित्तेकदा आतून मन-भावना कोलमडून पडलेले असहायतेने स्वत:ला अनुभवले ॥
मी नव्हे आपण हे तत्व रुजवताना सर्रास ढकलून निघून गेलेल्या आपल्यांना मी जवळून पाहिलय ॥
थोड्या पदासाठी वा महत्वासाठी सरळ सरळ प्रतारणा करणारे अनेक दिसले मला ॥
चालत्या गाडीला खीळ घालणारे तोंडपूजे नि पायखिचे अनेक आलेत वाटेत ॥
उगाच जळणारे ,उगाच मरणारे , उगाच येलणारेही बहूत गवसले प्रवासात ॥
आपुलकी दाखवत घंटोंशी गप्पा मारणारे, केसाने हळूच गळा कापताना पाहिले ॥
दुनियेचे रंगढंग पाहिले , अनुभवले पण तसे व्हायचे कधीच जमले नाही ॥
माझ्या एकटीच्या मार्गावर पावला पुरता प्रकाश करीत संथ तटस्थतेने सहज चालतेय मी ॥
अशीच समोरही चालत राहील ही तर नियती माझी नि कृपा गुरुची ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:
Post a Comment