#सहजोक्त
=शोध स्वत:चा=
कालचा दिवस जरा समाधान देऊन गेला.
आजही, याकाळातही उच्चशिक्षण सोपे नाही. पिएच्डी करावे हे जुने स्वप्न होतं .त्यानुसार डॉ. स्मिता होटे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी केली २००८ मध्ये . झपाटून कामाला लागले. कॉलेज-घर-सामाजिक कार्य सारं करून २०१०ला सादर केला प्रबंध . २०१२ला पदवी मिळाली.
आजकाल आनेकजण ही पदवी मिऴवतात . मग मी वेगळं काय केलं ? प्रबंधाचा समाजाला ,लोकांना उपयोग काय ? असे प्रश्न मनात येत होते. काल ईमेलवर पत्र आले नि मनाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली .
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना पिएच्डी करण्यासाठी अभ्यास रजा देत नाहीत वरून अधिक कामे लादतात. शिवाय या पदवीमुळे इन्क्रिमेंट वगैरे मिळत नाही. उलट "आम्ही तुमच्यासारखे पिएच्डी नाही बॉ"! असे आपुलकीचे बोल कानी पडतात.
तरीही मी "ही पदवी मिळवायचीच " असे ठरविले होते. विषय होता ,"विभिन्न राज्यातील माध्यमिक स्तरावरील क्रमिक संस्कृत पाठ्यपुस्तकांचे तौलनिक अध्यायन" .
भारतातील १८ राज्यांची शालेय संस्कृत पुस्तके गोळा केली. यासाठी मदतीला धावले श्रीकांतजी देशपांडे काका ,विद्याभारती संघटन मंत्री. त्यांच्या नेटवर्क मुळे सगळी पुस्तके मिळाली.
आज माझा प्रबंध NCERTने संदर्भसाहित्य म्हणून मागवला. इतकी मोठी संस्था याच विषयावर शोधकार्य करीत आहे. त्यांच्या प्रकल्पाचा सगळा खर्च केंद्रशासन करते. यंत्रणा त्यांच्या दिमतीला अाहे.
मी तेव्हा स्वबळावर केलाय याचा आज आनंद आहे.
आज कृतकृत्य वाटत आहे.देवाची कृपा ,गुरुजनांचे आशीर्वाद,स्नेहींच्या सदिच्छा नि घरच्यांची भक्कम साथ यामुळेच हे शक्य झाले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

No comments:
Post a Comment