भवानि त्वं दासे मयि वितर दृष्टिं सकरुणामिति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानि त्वमिति यः ।
तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज्यपदवीं मुकुन्दब्रह्मेन्द्रस्फुटमुकुटनीराजितपदाम् ॥
माझ्या आईच्या तोंडून मी हा श्लोक अनेकदा ऐकला होता. नेमकं सौंदर्यलहरी चाळताना हा श्लोक वाचला न् आईच्या तोंडातून ऐकलेला श्लोक परत जाणवला.
आदि शंकराचार्यांनी रचलेल्या सौंदर्यलहरी या काव्यातील बावीसवा श्लोक आहे हा. शंकराचार्यांचे काव्य प्रासादिक न् दिव्य होय. जगदंबेची आळवणी करणारे हे काव्य छानच आहे असे या काव्याचे उपासक म्हणतात.
मला मात्र हा श्लोक आईचा आशीर्वादच वाटतो.
=>> श्लोकाचा अन्वय व शब्दार्थ =>
भवानि => हे भवानि
त्वं => तू
दासे मयि => तुझा दास असलेल्या माझ्यावर
सकरुणां दृष्टिं => करुणामय दृष्टी
वितर => ठेव .
इति => असे
स्तोतुं वाञ्छन् => स्तुती करू इच्छिणारा
यः => जो (कोणी)
भवानि => "हे भवानी
त्वम् = तू"
इति => (फक्त इतकेच ) असे
कथयति => म्हणतो .
तदैव => त्याच वेळी
तस्मै => त्या ( म्हणणाऱ्यास ) मुकुन्दब्रह्मेन्द्रस्फुटमुकुटनीराजितपदाम् => मुकुंद -ब्रह्मदेव-इंद्रादींच्या तेजस्वी मुकुटांनी जिच्या पावलांचे नीराजन केले आहे अशी
निज सायुज्य पदवीम् => स्वतःची खास आंतरिक जवळीकीची पदवी
त्वं => तू
दिशसि => निर्माण करून देतेस .
ह्या श्लोकाचा अर्थ 'अप्रबुद्ध' श्री. अण्णासाहेब पाळेकर यांच्या पुस्तकातून घेतला आहे , तो असा -
=> हे भवानी ! तू मज दासावर करुणार्द्र दृष्टि टाक अशी स्तुती करण्याच्या इच्छेने 'हे भवानी ! तू' , इतके शब्द म्हटले नाही तोच तू इंद्र , ब्रह्मदेव, विष्णु ह्यांच्या भास्वर मुकुटांनी ज्याची पावले देदीप्यमान झाली आहेत असे आत्मसायुज्यपद त्याला अर्पण करतेस.
असं म्हणतात की ,श्रीविद्येच्या उपासकांच्यासाठी हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या प्रत्येक श्लोकावर एक यंत्र आहे. तसे याही श्लोकावर 'श्रीयंत्र' आहे.
अर्थात श्रीविद्येच्या उपासकांचा तसा अनुभव असेल. हा सर्वस्वी श्रद्धेचा विषय आहे. दुसऱ्यांच्या श्रद्धेचा आदर करावा , असे आई सांगायची .
श्रीविद्या-उपासना हा माझा प्रांत नाही.
केवळ माझी आई म्हणायची म्हणून हा श्लोक माझ्यासाठी तिचे 'वात्सल्यरूप' आहे . याच भावनेने श्लोकावर लिहिले आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
मस्तच
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteछानच ग...
ReplyDeleteखासच....
ReplyDeleteधन्यवाद
Deleteछान
ReplyDeleteवात्सल्य-स्वरुप श्रद्धा 🙏
ReplyDeleteधन्यवाद
Deleteनानालंकारयुक्त हॄदयोद्गत मातृवन्दना।
ReplyDeleteधन्यवाद
Delete