#सहजोक्त
नको खंत बाळगू , जगात सुवर्णाचीच परीक्षा केली जाते !
सतत लोखंड-पितळ बाळगण्याचीच हैसियत आहे त्यांची
कदाचित म्हणून संशय घेतात तुझ्यावर ।
खरे तर तुझ्यावर अविश्वासाचा विषयच नाही ,
त्यांच्याच लायकीवरचा त्यांचा संशय आहे तो.
इतकं चांगलं अापल्याला मिळेलच कसे ? याच्याच खात्रीसाठी काढलेले हे चिमटे आहेत ते !
म्हणून खंत नकोच बाळगू ,परीक्षा
घेणा-यांची ,
सोनंच आहेस तू, हे तुलाही माहितच आहे !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment