Tuesday, April 25, 2017

सहजोक्त


#सहजोक्त
 तुकारामांची अभंगगाथा वाचताना अनेक अभंग आवडले ,मनात घर करून गेले. नवनव्या शब्दकळा  समजल्या. सहज-सोपं काय ? ते कळले.

 आजकाल सोशलमिडियाचा सुकाळू !
 "जेवढं सोसल तेवढं मिडिया " नाही तर सोसच फार!!
 "गल्लीत विचारी ना कुत्र नि म्हणे मिडियात पाच हजार मित्र " ही नवी म्हण अल्पावधित प्रसिद्ध झाली ती मिडियाच्या "आभासी" बंधांमुळेच.
 .
 तुकाराममहाराजांना तेव्हाच सोशलमिडियाच्या दिखावू-लटक्या नात्यांचा अंदाज आला होता वाटते.
 हा अभंग पहा .
 अतिशय समर्पक ठरतोय आजकालच्या सोशल(मिडिया)लाईफ़साठी (सॉरी ,फ्रेंडशिपसाठी)
 संतांना त्रिकालज्ञ म्हणतात ते उगाच नाही..

लटिकें हासें लटिके रडें।
लटिकें उडें लटिक्यापें ।१।
लटिकें माझें लटिकें तुझें।
लटिकें अोझें लटिक्याचें ।२।
लटिके गाये लटिके ध्यायें ।
लटिकें जायें लटिक्यापें ।३।
लटिका भोगी लटिका त्यागी।
लटिका जोगी जग माया।૪।
लटिका तुका लटिक्या भावे।
लटिकें बोले लटिक्यासवें ॥५॥
(२८७७. तुकारामाचे अभंग .शासकीय प्रत  दुसरे मुद्रण १९९१ )
© डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपुर
२५.૪.२०१७



No comments:

Post a Comment

#सहजोक्त

. क्षमा शस्त्रं करे यस्य  दुर्जनः किं करिष्यति।  अतृणे पतितो वह्निः  स्वयमेवोपशाम्यति॥ ज्याच्या हातात क्षमा नावाचे शस्त्र आहे, त्याचे दुर्जन...