Saturday, June 24, 2017

#सहजोक्त

#सहजोक्त
२४.६.२०१७
आज आषाढाचा पहिला दिवस.कालिदासाने मेघाला दूत बनवून यक्षाचा संदेश पाठवला होता. "मेघदूत" नावाचे अजरामर काव्य लिहिले होते.

आज मी व सुरेखाआत्या प्रवासात आहोत.महाराष्ट्र, मध्यप्रदेश ,हरियाणा ,उत्तरप्रदेश ,दिल्ली असे पांच राज्य खिडकीतून रेलमार्गावरून पाहिले. द-या डोंगरं ,झाडं ,नद्या ,पक्षी ,आकाश तेच आहे,तसेच आहे असे वाटतं पण तरी काही तरी वेगळेपणा असतोच थोडाथोडा. वेगवेगळ्या राज्यातील शहरी व ग्रामीण जीवनातही बदल दिसला. कौलारू घरं ,प्रत्येक प्रांताचे वेगळेपण दाखवणारी. एसीच्या बंद काचेच्या खिडकीतून निसर्गाच्या वैविध्याचे दर्शन घेतले!!

ढगाचा दरवर्षीचा ठराविक प्रवास ,आमचा पूर्वनियोजित पण एखादवेळेस होणारा प्रवास.

काय गम्मत असते ना आयुष्य म्हणजे ! दूता कडून संदेश पाठवायचा तरी खडतर प्रवास अटळच.
प्रत्येकाचा मार्ग ठरलेलाच.कंफर्टझोनचा एसि पाहिजेच.  दृष्टिकोण रूपी खिडक्याही असणारच.शिवाय प्रतिष्ठा नावाची पारदर्शक कांच सुद्धा हवीच हवी.

आषाढस्य प्रथम दिवसे . . . . कालिदासाला श्रुंगारकाव्य सुचलं ;  काव्यातील ,चित्रपटातील श्रुंगारप्रसंगांवर समाधान मानणा-या  आम्हा सामान्यांना दैनंदिन जगण्यातून उसंत मिळाली तर फक्त शांत करणारे क्षण हवेत, बाकी आनंदच .

   ©डॉ. प्रज्ञा देशपांडे

No comments:

Post a Comment