#शब्दचिंतन .
काल सारखंच आजही ढगं दाटून आले. भर दुपारी अंधार पडला . न् पाऊस कोसळू लागला. लाईनही गेली .मग काय करावं ? खिडकीत बसून धो धो कोसळता पाऊस , अंधारलेलं आसमंत न् चिंब भिजणारी झाडं-पाखरं बघू लागली. अशा पावसाळी , काळोख्या दिवसाला संस्कृतात 'दुर्दिन' म्हणतात. किती चपखल आहे ना ?
या अंधारी पावसाळी दिवसाला "मेघाच्छन्नदिनम् " असं अमरकोशात म्हणतात. दुर्दिनाला घनान्धकार सुद्धा म्हणतात. दुर्दिन म्हणजे काय तर “घनान्धकारे वृष्टौ च दुर्द्दिनं कवयो विदुः ॥” बरसणारा घनांधकारी दिवस .
संस्कृतातील किती तरी काव्यांमध्ये कवींनी या दुर्दिनाचे वर्णन अतिशय हळूवारपणे न् प्रणयपोषक केले आहे.
अशा दुर्दिनी अभिसारिका लपत छपत अभिसार करायला जाते वगैरे. जसे कुमारसंभवात एके ठिकाणी , “यत्रौषधिप्रकाशेन नक्तं दर्शितसञ्चराः । अनभिज्ञास्तमिस्राणां दुर्दिनेष्वभिसारिकाः ॥"(। ६ । ४३ ।)
संस्कृत साहित्यात दुर्दिन हा प्रेमी जीवांसाठी भलेही सुयोग न् आनंददायी वर्णिला असला तरी सामान्यांना तो काहूर माजवणारा , हुरहूर वाढवणारा, काहीसा उदास वाटतो.
खरोखर मनाला चुटपूट लावणारा हा दुर्+दिन असतो कां ? रिकाम्या मनाला हे चोचले सुचणं स्वाभाविक आहे.
"सम्प्राप्ते दुर्द्दिने काले दुर्द्दिनं भाति वै नभः ॥”(हरिवंशे । ६७ । ६६ । ) एकूण मनच निराश असेल तर सर्वच अंधारलेलं दिसते.
स्वतःच्या कर्तव्यात अखंड बुडलेल्यांना सुदिन काय की दुर्दिन काय ? सारे सारखेच असतात. आपले कर्तव्य नियमितपणे केले की अशुभ काहीच होत नाही. सर्वच शुभ घडत असते.
“सुदिनं दुर्द्दिनञ्चैव सर्व्वं कर्म्मोद्भवे भव । तत् कर्म्म तपसां साध्यं कर्म्मणाञ्च शुभाशुभम् ॥” ( ब्रह्मवैवर्त पुराण)
ढगाळ पावसाळी बरसत्या काळोख्या दिवसाला भलेही दुर्दिन म्हटले तरी कर्तव्यपरायणांसाठी सगळेच दिवस सुदिन अन् कामचुकारांसाठी सगळेच दिवस दुर्दिन असतात , हेच खरे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:
Post a Comment