Monday, February 20, 2017

#शब्दचिंतन


#शब्दचिंतन

दोला,दोलन,आंदोलन,हस्तांदोलन,भक्ति-आंदोलन

डोला रे डोला ,दिल डोला,मन डोला ....गाणं ऐकून पायही ताल धरू लागतात.
 हा 'डोला" अपल्या मराठीतही डोलणे या अर्थी आहे ना! हो तोच अर्थ.

डोलणे,झुलणे,हिंदोळे घेणे ,झोके घेणे,झोपाळा ...किती किती शब्द आहेत.
साधारण एका अर्थाचे पण छटा वेगळ्या.
संस्कृतमध्ये दोला ,दोलिका असे (नाम) शब्द आहेत .त्यापासून "दोलायते" असा नामधातू तयार झालाय.
मराठीत नाही कां ?,'हाताळणे,रक्ताळणे'असे नामधातू आहेत.(म्हणजे नामापासून बनलेले क्रियापद) तसा .

तर दोला म्हणजे झोपाळा ,तोही दोरी किंवा पारंबीचा.बंगईला(पाऴणा,लाकुड वगैरेचा) "प्रेंखा" म्हणतात. दोन्ही झोकेच घेतात.पण गतीत ,,पद्धतीत फरक आहे.
भौतिकशास्त्रानुसार त्याचे विश्लेषण करता येईल,पण मी भाषिकअंगानेच विचार करणार.

दोरीचा झुला जसा "स्विंग" घेतो,वर जाऊन खाली येतो,त्याला झोका म्हणतात.तोच खरा दोला/डोला.
तो जसा हिंडकळतो ,झुलतो तसंच माणसाचे मन आशा-निराशेच्या आवर्तात भरकटते.मनाची गती अन् झुला सारखाच. कोणताही 'भाव'(मुड) एकसारखा नसतो.
दोलन म्हणजे डोलण्याची क्रिया सुरू असलेली अवस्था.
आंदोलन - यातही  दोलन आहेच. पण एका ठैरावासह. हस्त-आंदोलनातही तोच दिसून येतो. दोलनात सतत गतिमानता आहे ,हस्तांदोलनात थोडं थांबत,गती आहे. भक्ति-आंदोलनात सुद्धा
आवर्त-प्रत्यावर्त असतात.एका टप्प्यापर्यंत गती मग ठैराव मग पुन्हा गती ...असा हा प्रकार.

दोला-दोलन-आंदोलन...सारे सारे मनाच्या/भावनांच्या अवस्थांना लागू होतात.
दोला>डोला>हिंदोळ>झुला ...सुंदर मराठी शब्दश्रीमंती..........

©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...