Thursday, January 11, 2018

#कविता

#कविता
नेहमी सगळ्यांना सावली देणा-या झाडालाही कधी तरी सावलीत बसावं वाटत असेल ना ?
सतत सर्वांचे भार सहून पोसणा-या वसुंधरेला  कोणी तरी आधार असावा वाटत असेल ना?
ऊर्जा देत दिनरात तळपणा-या सूर्याच्या जवळ हळूच मायेची पखरण करीत कोणी असावं ना?
दुनियेचा खारटपणा पोटात घेत गोड ढगांतून वर्षणा-या सागराची तृष्णा भागवावी ना कोणी?
अनेकांचा आधारवड झालेल्या मनाला  कातरक्षणी साधार भावनिक जपावं ना कोणी ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे



No comments:

Post a Comment

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...