Sunday, January 14, 2018

#कविता

#कविता.
असा कसा ग यशोदे तुझा हा कान्हा
किती सांगू  बाई याच्या कागाळ्या ग कुणा? ॥॥धृ॥

जमवून सा-या गोकुळीच्या बाळगोपाळा
शिकवी चोराया लोणी हांडीतील सकळा
गाई राखतांना करी खोड्यांच्या नानाकळा
यमुनेच्या काठी जमवी गोपाळांचा मेळा ॥
॥१॥

घागर फोडी मारून दगडं डोक्यावरची भारी
गोपीवस्रांची करून पळवापळवी हा बेजारी
छळण्याची ग सदाची  रीतच बाई याची न्यारी
तरीही मनामध्ये आमुच्या याचीच मूर्ती साजिरी
॥२॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे


1 comment:

#सहजोक्त

. क्षमा शस्त्रं करे यस्य  दुर्जनः किं करिष्यति।  अतृणे पतितो वह्निः  स्वयमेवोपशाम्यति॥ ज्याच्या हातात क्षमा नावाचे शस्त्र आहे, त्याचे दुर्जन...