Saturday, January 6, 2018

#सहजोक्त


कृष्ण देवच होता
पूर्णपुरुष होता
सोन्याच्या द्वारकेचा राजा होता
आठ पट्टराण्यांचा भर्तार होता
सुदामा-पेंद्याचा यार होता
सोळा हजार स्त्रियांचा पती होता
पांडवांचा परममित्र होता.
सांदिपनींचा शिष्य होता
गोकुळाचा प्राण होता
गोपींचा रमण होता
भक्तांचा तारणहार होता
कुशलनीतिज्ञ ,पराक्रमी-वीर होता
तत्त्ववेत्ता होता ,द्रौपदीचा सखा होता
राधेचा जीव होता ,मीरेचे आराध्य होता.
तसं त्रिलोकात देवांचा देव म्हणूनच ख्यात होता.
तरी मनाला एकच बाब कायम सलते इतकं सगळं छानच होतं ,
तर शेवटही छान कां झाला नाही ?
एका व्याधाच्या साध्या बाणाने मृत्यू यावा ?
आयुष्यभर ज्या असुरांच्या विरुद्ध लढा दिला त्यांच्याच कन्येचे सासरेपण नशिबी आले.
आपल्याच डोळ्यादेखत यादवी बघणेही आले.
निर्माण केलेली द्वारकाही डुबणे टाळता आले नाही.
कुलस्त्रियांचे परपुरुषांकडून अपहरण देखिल ना अर्जून टाळू शकला ना कृष्णाचे सत्त्व.
आयुष्य सारे अन्यायाविरुद्ध लढण्यात गेले मग शेवट दु:खान्त कां?
ही सल सतत कुरतडते मनाला  की कां असं व्हावं देवाचे ?
केवळ ईश्वरेच्छा ? की कर्माचा सिद्धान्त  ? की मानवी जीवनाची अगतिक अपरिहार्यता ? की 
दैवगती? की काय ? नेमकं काय ?  प्रत्येक कृष्णाने विचार करावाच याचा .
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


2 comments:

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...