Saturday, February 22, 2020

सहजोक्त.



#माझ्यावर मी खुश आहे .......
सगळं मनासारखं होईना कां जरी
लयीत सारं असो वा नसो काही तरी
वेळ मिळो अथवा न मिळो त्यापरी
माझ्यावर मी मात्र खुश आहे भारी॥
आजवर अनेक पाहिले उन्हसावलीचे खेळ
समतोल साधत जमवलाय जगण्याचा मेळ
मनासारखं सगळंच नाही घडलं सारं
तरीही माझ्यावरच मी खुश आहे बरं ॥
तक्रार अनेक गोष्टींसाठी करता येईल
अनेक बाबींसाठी  मनात झुरता येईल
खूप काम अजून करायचं आहे बाकी
आज तरी माझ्यावर खुशच आहे मी ॥
घडलं-बिघडलं ,तुटलं-फुटलं,मोजून काय होणार
झाल गेलं गंगेला मिळालं ,रडून काय साधणार
एकाच गाडीची चक्रे, प्रयत्न आणि दैव
माझ्यावरच खुश रहाणार आहे मी सदैव ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...