Sunday, February 23, 2020

सहजोक्त.


#कविता.
स्नेह संपल्यावरी दिव्यातील ,
ज्योती अलगद मालवती ।
जगता जगता तसे काहीसे
गवसुनही नुरती मोती ॥१॥

फूल सुगंधी सुखावणारे
हळुच गळुनी खाली पडे ।
अल्लड क्षण जे हळवेसे ते
पुन्हा मागुती कधी न फिरे ॥२॥

रिक्त अोंजळी अोलावा धरी
गळले जल त्यातील जरी ।
दुरावलेले वळणावरती
मन सदा स्मरणी रमती ॥३॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...