Tuesday, February 25, 2020

#सहजोक्त.

कधी तरी आड वेळी ,होई जिवाची काहिली ।
आठवाच्या झुळूकीनी ,तनु दाह-दाह होई ॥१॥
तुझी आठवण जशी , चांदणं ग उन्हातली ।
चंद्र कौमुदी विरही ,सूर्य वैशाख वणवी ॥२॥
धूमकेतु आठवाचा ,धरेवर आदळला ।
किती सावरा सावरा ,अस्वस्थ ही वसुंधरा ॥३॥
सय आली ग दाटून , हृदयाच्या खोलातून ।
धारा वाही डोळ्यातून ,अंतरंगाला छेडून ॥૪॥
होता तुझे ग स्मरण ,शुन्यावते माझे मन ।
अंतरंगाला छेडून ,धारा वाही डोळ्यातून ॥५॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...