#कविता.
असा कसा ग यशोदे तुझा हा कान्हा
किती सांगू बाई याच्या कागाळ्या ग कुणा? ॥॥धृ॥
जमवून सा-या गोकुळीच्या बाळगोपाळा
शिकवी चोराया लोणी हांडीतील सकळा
गाई राखतांना करी खोड्यांच्या नानाकळा
यमुनेच्या काठी जमवी गोपाळांचा मेळा ॥
॥१॥
घागर फोडी मारून दगडं डोक्यावरची भारी
गोपीवस्रांची करून पळवापळवी हा बेजारी
छळण्याची ग सदाची रीतच बाई याची न्यारी
तरीही मनामध्ये आमुच्या याचीच मूर्ती साजिरी
॥२॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
असा कसा ग यशोदे तुझा हा कान्हा
किती सांगू बाई याच्या कागाळ्या ग कुणा? ॥॥धृ॥
जमवून सा-या गोकुळीच्या बाळगोपाळा
शिकवी चोराया लोणी हांडीतील सकळा
गाई राखतांना करी खोड्यांच्या नानाकळा
यमुनेच्या काठी जमवी गोपाळांचा मेळा ॥
॥१॥
घागर फोडी मारून दगडं डोक्यावरची भारी
गोपीवस्रांची करून पळवापळवी हा बेजारी
छळण्याची ग सदाची रीतच बाई याची न्यारी
तरीही मनामध्ये आमुच्या याचीच मूर्ती साजिरी
॥२॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
अप्रतिम।
ReplyDelete