Sunday, March 25, 2018

#चित्रकविता.

 जे झालं ते होऊन गेलं, झालं.
बरं झालं असं कसं म्हणू ?
हातातून घसरलेली वाळू
अन् निघून गेलेले क्षण
यांना माझं तरी कसं म्हणू ?
भरलेला हात नि मनावर कोरलेल्या स्मृती
त्यां माझ्या नाहीत हे कसं मानू ?
काय मनात असेल देवाच्या ते तोच जाणे
पण नकोच ते सल ,ती तगमग नि लिप्तता.
आंतरबाह्य मुक्त कर जोखडातून एकदा ॥
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...