#सहजोक्त.
आज एक शब्द पहिल्यांदाच वाचण्यात आला.छान वाटला. दोन तीनही शब्दकोशात आढळला नाही. अॉनलाईन शब्दकोशात आढळला पण वेगळ्या अर्थाने.आज छान वाटलं ,रविवारचा सदुपयोग झाला.
"यस्य पर्णमयी जुहूर्भवति न स पापं श्लोकं शृणोति "। (तैतिरीय संहिता३/५/७/२) अर्थ असा की , "जुहू(चमचा) जर पर्णमय (पळसाचा) बनवला ,तर त्यामधून एक विशिष्ट अपूर्व निर्माण होते.
वेगळ्या संदर्भाने काही वाचत होती न् शब्द दिसला. शब्द तसेही आवडतात.
जुहू हा शब्द मुंबईचे एक उपनगर म्हणून परिचित आहेच . पण आजवर हा शब्द संस्कृत मध्येही आहे ,हे माहित नव्हते.
वरील वाक्यात जुहू शब्द चमचा या अर्थाने आला आहे. तर अॉनलाईन शब्दकोशात जीभ,ज्योत , ब्रह्मदेवाची पत्नी ,पळी असे अनेक अर्थ दिले आहेत.
जुहू म्हणजे चमचा , पळी (ज्याला संस्कृतात दर्वी म्हणतात ) असा अर्थ कळला आणि छान वाटले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:
Post a Comment