.................................
#सहजोक्त.
प्रत्येक घरात एक देवघर असेल नसेलही कदाचित , एक कचराकुडी नक्कीच असते.
देवाची साग्रसंगीत पूजा रोजच किंवा सणावारी केल्या जातेच असे नाही .
पण कचरा मात्र रोज निघतोच निघतो.
देव श्रद्धेचा विषय असतो , कचरा मात्र प्रत्यक्ष अस्तित्वात असतो.
देव असावा की नसावा हे श्रद्धा ठरवते...
कचरा मात्र कोणीच टाळू शकत नाही.
त्यामुळे देवघर ऐच्छिक आहे पण कचराकुंडी अत्यावश्यक...
गरजेचे मिळावं म्हणून देव नावाची श्रद्धा असते .
तर गरज संपल्यावर उरलेलं सारं कचराच ठरते ...
कचरा सर्वत्र स्वतःचे असदस्तित्व दाखवूनच देतो .
देवाचं नेमकं उलटं असतं , गरजेच्या वेळी नेमकां डळमळीत करतो , जणु आहे की नाही असा !
बाहेर जसे देवघर न् कचराकुंडी असते तसेच मानवी मनातही हे दोन्ही असतात , नाही ?
जितकं जितकं मन-शरीराला निर्मळ करावे तितका तितका कुठंतरी कचरा जमतोच जमतो.
अटळ असा कचरा होऊच नये म्हणून मन निर्मळ करण्यापेक्षा अलिप्त , निर्लेप , पुनर्वापरयुक्तच कां करु नये ?
म्हणजे देवघरातील देवापेक्षा कचरा ठळक दिसणार नाही न् निर्लेप मनाहून वेगळा देवच असणार नाही.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

उत्तम...
ReplyDeleteWhat about those who don't believe in God I.e.Deo and Deoghar?
ReplyDeleteत्यांना जे श्रद्धा-ठेवण्यास योग्य वाटतं ते त्यांचा देव
Deleteत्यांना ज्यावर श्रद्धा असेल ते त्यांचा देव ....
ReplyDeleteखरच किती सोप्या शब्दात निर्मळ मनात महत्त्व सांगितले👍
ReplyDelete