Tuesday, January 11, 2022

 सहजोक्त.


फळे मधुर खावया , असती नित्य मेवे तसे ।

हिरे-जडित-सुंदरी कनक-पंजरीही वसे ॥

अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे।

स्वतंत्र-वन-वृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे ॥

कृष्णशास्त्री चिपळूणकरांची पृथ्वी वृत्तातील  ही अन्योक्ती.  जुने लोकं , जुने तत्त्व न् जुने विचार ! 

आता काळ बदलला . समाजमान्यता बदलल्या. 

आता या शुकान्योक्तीला  बदलावेच लागेल ना ?  "कष्टाची भाकरी" फक्त कथेतच छान..   चिपळूणकर शास्त्रींची क्षमा मागून  नव-अन्योक्ती रचते आहे.


फळे मधुर खावया , असती नित्य मेवे तसे ।

हिरे-जडित-सुंदरी कनक-पंजरीही वसे ॥

अहर्निश सुखासनी शुक मजेत ऐदी फिरे ।

स्वतंत्र-वन-वृत्तीला कधीहि तो पुन्हा ना स्मरे ॥


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...