#सहजोक्त ~संवादकाव्य.
कोणी तरी विचारले ,," आवडती भाषा कोणती ?"
मी म्हटले,"संवादाची ,मनाला मनातून जोडणारी ,
एकदा "आपली"म्हटले की सर्वार्थाने स्वीकारणारी".
पुन्हा कोणी तरी म्हटले ,"प्रमाण की बोली ?"
उत्तरले मी ,"तारतम्याचे प्रमाण मानून हृदयाची बोली.".
"शुद्धतेचे काय ?" पुन्हा गहन प्रश्न !
"शब्दांच्या पलीकडले भाव आकळणारे मन हवे रे शुद्ध !!"
"मग काय ,व्याकरणाचे नकोच बंधन ?"
"अरे बंध जपा मानवीनात्यांचे .तुझा-माझा संवाद नव्हे शर्यतीचे मैदान !"
"मग नेमकी आवडते कोणती भाषा ?"
"ये हृदयीचे ते ह्रदयी करीत चराचराला पसायदान देणारी माऊलीची वात्सल्यभाषा !"
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपूर.

No comments:
Post a Comment