#सहजोक्त
आराम: कल्पवृक्षाणां
विराम: सकलापदाम्
अभिराम: त्रिलोकाणां
राम: श्रीमान् स न: प्रभु:॥
सायंकाळी श्रीरामरक्षास्तोत्र म्हणतांना आज अचानक या श्लोकावर थबकली.
किती सुंदर रचना आहे ही.आराम-विराम-अभिराम-राम ..किती सुंदर शब्द.एकाच मूळधातूपासून तयार झालेले कृदन्तरूपे.
पहिले श्लोकाचा अर्थ बघू. श्रीरामाचे गुणवर्णन करतांना बुधकौशिक ऋषी म्हणतात , कल्पवृक्षांचे जणु आराम (उद्यान) ,सगळ्या संकटांच्या विलयाचे स्थान ,तीनही लोकात देखणा ,तो श्रीमान (श्री =लक्ष्मी युक्त) राम आमचा प्रभू ,स्वामी,मालक आहे.
राम शब्दच मुळात रम् (मुळधातू) रमणे या अर्थी असलेल्या धातूपासून बनवला आहे. ज्यात रमण्यासारखा आहे असा तो राम.बाकी कशात राम नाहीच.
आ+राम= उद्यान .मराठी /हिंदीत आराम म्हणजे विश्रांती असा अर्थ घेतात. तसेही बगिच्यात मनाला आराम मिळतोच निसर्गाच्या रमणीयतेने.
विराम म्हणजे विश्रांती . संकटे टाळत नाही तर हा त्या संकटांचा विलय / लोप करतो.
अभिराम .हा माझा आवडता शब्द .सर्व बाजूने ( व्यक्तिमत्वाच्या सर्वांगाने) जो रमणीय आहे तो अभिराम. तीन्ही लोकांना ज्याने रमवले ,गुंतवले स्वत:त तो राम ,अभिराम असणारच.
श्लोकात या चारही शब्दांचा किती सुरेख वापर केलाय ना!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर .

No comments:
Post a Comment