Saturday, May 27, 2017

सहजोक्त

#सहजोक्त



संकटेपण मला तसे फार घाबरतात,
एकटे न येता समूहाने वार करतात॥

कधी दोस्त बनून गळा कापतात,
तर कधी दुश्मनगिरी पार निभवतात॥

न डगमगता धीराने मी चालत राहते,
उपेक्षा अपमान टोमणे निमूट झेलत जाते ॥

 आतून  तोडण्याचा अनेकदा प्रयत्न करतात ते,
पण तितक्याच ताकदीने ऊर्मी मला उभी करते ॥

कितेकदा कोलमडून पडतेय असे वाटते ,
पण कुठून ही आंतरिक हाक मला साद देते ॥

तीच मला वाट दाखवून खळग्यातून बाहेर काढते ,
तीच मला पुन्हा रुजण्यास समर्थपणे मदत करते ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपूर.

No comments:

Post a Comment

शिवस्तुती -कैलास राणा भाग4

  #सहजोक्त. अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय । कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥ भावार्थ: अनाहत ...