#सहजोक्त~ भाग ६
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥6॥
भारत न् रावणाची लंका यांच्या मध्ये विशाल समुद्र होता. ज्यावर वानरांच्या सहायाने रामाने सेतू बांधला. जणु लंकेचे द्वीप सेतूने सांधले. आणि लंकेवर विजय मिळविला. शरीराचा भार उचलणारे पाय . पायांना नीट हालचालीला आवश्यक असा सांधा म्हणजे दोन्ही गुडघे. तर अशा या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण सेतु रचणारा राम करतो.
पोटरीला संस्कृतमध्ये जंघा म्हटले आहे.
दहा तोंडांच्या रावणाचा नाश करणारा राम , माझ्या पोट-यांचे रक्षण करो.
श्रीराम हे साक्षात विष्णुचे अवतार.त्यांच्या पायांची सेवा लक्ष्मी करते. लंकेवर विजय मिळविल्यावर ते राज्य न् सर्वच ऐश्वर्य बिभिषणाला देऊन श्रीराम अयोध्येला परतले. बिभिषणाला सर्व ऐश्वर्य देणारे श्रीराम , माझ्या पाऊलांचे रक्षण करो.
आणि अशा प्रकारच्या सर्वच विशेषणांसह असलेला श्रीराम माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करो.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
मस्त अप्रतिम
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद. सर्वच भाग वाचावे.👍
ReplyDelete