#शब्दचिंतन.
बरेच दिवसात खरे तर शब्दचिंतन केलेच नाही. वेगवेगळ्या कामात गुंतले असल्यामुळे डोक्यात आलेल्या शब्दांवर विचार करायला जमतच नव्हते.
माझ्या ब्लॉगचे नियमित व चिकित्सक वाचक डॉ.राहुल यांच्याशी बरेचदा शब्दांबद्दल चर्चा होते. अशाच एका चर्चेतून आजचे शब्दचिंतन करीत आहे.
'ख' हा एकाक्षरी शब्द आहे. शब्दकोशात त्याचे अनेक अर्थ दिले आहेत. जसे सूर्य, आकाश, स्वर्ग, ज्ञानेंद्रिय , नगर , क्षेत्र , अनुस्वार ,बिंदु , शून्य , छिद्र , पोकळ , मानवी शरीराची नऊ द्वारं , जखम , आनंद , ज्ञान , ब्रह्मा इत्यादी.
वर दिलेले अनेक अर्थ असूनही ख म्हणजे आकाश हेच जास्त प्रचलित आहे.
खग = आकाशात गमन करणारा
खेचर = चआकाशात फिरणारा
इत्यादी शब्द प्रसिद्ध आहेतच.
शंख ,सुख,दुःख या शब्दात येणा-या 'ख'चा अर्थ काय ? हे शब्द कसे तयार झाले असतील ?
डॉ.राहुल त्यांनी सुख-दुःख या शब्दां विषयी त्यांचे विचार मांडले . त्यांच्या मते सुख म्हणजे आपल्या भोवती सकारात्मक आकाश तयार होणं तर त्याच्या विपरीत दुःख होय. आपल्या भोवतीचे आकाश शमन (शांत) करणारा तो शंख.
मी वैय्याकरणी नाही. तसेच शब्दकोशात अशा व्युत्पत्त्या दिसत नाहीत. त्यामुळे खरोखर या शब्दांची व्युत्पत्ती काय असावी बरे ? हा प्रश्न अजून मला अनुत्तरीतच आहे. शिवाय राहुल यांचे मत आशयाच्यानुसार एकदम नकारण्या योग्य वाटले नाही.
या त्यांच्या मतामुळे " ख" बद्दल सखोल विचार करावा असे निश्चितच वाटले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:
Post a Comment