#चित्रकाव्य.
श्रद्धायुक्त जगण्या इतका विश्वास देशील ना ?
अंतर्मन तृप्त होईल इतका घास देशील ना ?
नित्यानंदे उपभोगावा इतका श्वास देशील ना ?
तुझेच नाव शेवटी येईल ,इतका ध्यास देशील ना ?
सर्व मागण्या पूर्ण करशील इतका त्रास मी देऊ ना ?।१॥
© डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment