Saturday, May 12, 2018

#चित्रकविता


तू-तूू-मी -मी

तू म्हणजे फ़ॅक्टचा पुतळा
तू म्हणजे वास्तवाचा मेळा
मी काय फँटसीची माळा
मी स्वप्नांचा पसारा ॥१॥
तू अफाट कर्तृत्ववान्
तू आहेस रे महान्
मी फावल्या वेळेचा मान
मी रिकामी नि लहान॥२॥
तू अथांग आकाश अनंत
तू दयाळू कृपावंत
मी क्षणिक सुखाची उसंत
मी शांत ,निवांत ,संथ ॥३॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर

No comments:

Post a Comment

सहजोक्त.

  . शिवी ... अबबो आता शिवीवर पण लिहायचे कां? 😊 हं! लिहिता येऊ शकते. मराठी भाषेत 'शिवी' शब्द कुठून, कसा आला असेल बरे? मराठी भाषेतील ...