Wednesday, May 16, 2018

#चित्रकविता.

#चित्रकविता.

जेव्हा कधी कानी अंतरीची साद येते
 हृदयातील शब्दसुम अोठातून  उमलते  ॥
रचणे नसते  केवळ, ते तर स्फुरणे असते
हळूवारपणे  चिरंतनाक्षरातून उरणे असते ॥
निमित्त टिकावू नसेल तर शब्दांना  सूज येते
अद्वैतचिंतनाने मात्र शब्दमधुर बाळसे धरते ॥
काव्य-साहित्य सारं काही त्याचेच रूप असते
स्वतःहून स्वतः गवसल्याची ती  खूण असते ॥
खुशाल म्हणोत बापडे कोणी साहित्यरचना त्याला 
पण तो असतो प्रतिसाद दिलेला सादेला आतल्या ॥ 
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment

#सहजोक्त

. क्षमा शस्त्रं करे यस्य  दुर्जनः किं करिष्यति।  अतृणे पतितो वह्निः  स्वयमेवोपशाम्यति॥ ज्याच्या हातात क्षमा नावाचे शस्त्र आहे, त्याचे दुर्जन...