तशी मी खरोखर भाग्यवान आहे.
सध्या लॉकडाऊन सुरु आहे. घरातच रहायचे आहे. पण बघा दैवाने माझं घर अशा कॉलनीत आहे जिथे बैठी स्वतंत्र्य बंगल्यांची अोळ आहे न् शिवाय कॉलनीच्या मध्ये मध्यम आकाराचं मोकळ मैदान आहे . ज्या मैदानात मोठ-मोठी १९ झाडं आहेत न् यंदा लावलेली १५/ २० छोटी रोप आहेत.
अगदी माझ्या दारासमोर रस्त्याच्या कडेला मोठं बकुळीचं झाड आहे.
लॉकडाऊन असूनही घरासमोरील बकुळीच्या पाराखाली निसर्ग शोभा अनुभवत बसता येतं , हे ही नशीबच .
आज इथे फिरताना जाणवलं की वा-याला बकुळीचा सुगंध आहे.. सहज वर बघितलं , झाडाकडे तर दाटून लगडलेल्या हिरव्याकंच पानापानातून पांढरट फुलं भरगच्च लागली , केशरी फळं सुद्धा आहेत मध्ये मध्ये.
बकुळीच्या पाराखाली बसलेय , पुष्पवृष्टी होतेय . फुलं गोळा करतेय.. आता माळ करीन न् रेशमी कपड्यांच्या खणात ठेवीन ..
लॉकडाऊनमुळे अनुभवायला मिळणारे वैभवी क्षण.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment