Friday, April 17, 2020

सहजोक्त.

#संवाद.
 संवादातून प्रश्न हजारो
 सहज सुटती हेच खरे
  कसा नि कां  संवाद खुंटतो
    प्रश्न सद‍ा हा मनात उरे  ॥
  नुसते बोलणे म्हणजे नव्हे
  संवादाचे स्वरूप अहा
  समतल  वैचारिकतेने व्हावे
  मर्म खरे त्यातून पहा ॥
   मनात जागती समानुभूती
  नित्य असावी संवादी
   भावशून्यसे शब्दस्वार्थी
  वाढवती बघ वादावादी ॥
  शब्द फुलोरे आणिक शिल्पे
  फुंकर कोरडी जखमेला
  स्नेहाळ स्पर्श न् भावुकतेने
  संवाद-संत्वना हृदयाला ॥
  संवाद असे हृदयाची कला
  विसंवाद हरी नात्याच्या बला
  जपण्या मनी सुहृदत्वाला
  अहं त्यजुनी संवादू चला ॥
  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

No comments:

Post a Comment

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...