#स्वतःला राखा न् दुस-याला यश द्या.
महाभारतकाळात कुरुक्षेत्रात युद्ध सुरु होते. रथी , अतिरथी , महारथी सर्वच धुरंधर . सर्वेजण युयुत्सु-भावनेने लढत होते. हत्ती, घोडे यांच्या सारखे विशालकाय प्राणी देखिल युद्धात बिच्चारे ठरत होते.नेमकं त्यावेळी त्या युद्धभूमीवरील एका झाडावर घरट्यात चिमणी न् तिची दोनतीन पिलं भयभीत अवस्थेत जगत होते.
मनोमन देवाचा धावा करीत होते. इकडे दिवसोंदिवस परिस्थिती विकट होत होती. त्यात दुर्दैवाने ते झाड त्या युध्दातील धुमश्चक्रीत कोसळले . चिमिणीचे घरटे नेमके युध्दस्थळी पडले . कोवळी पिले न् बलहीन चिमणी यांच्या करूण-विलापाकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. आता आपण वाचू शकत नाही , ही भावना मनात येत होती. तितक्यात एका महाकाय हत्तीची घंटा गळ्यातून तुटून खाली पडली. नेमकी चिमणीचे घरटे त्या घंटेच्या आत बंद झाले.
महाभारताचे युद्ध १८व्या दिवशी थांबले. युध्द समाप्तीनंतर , झालेली पडझड व एकत्रित नुकसान बघायला स्वतः भगवान कृष्ण निघाले .. युध्दभूमीत मध्येच असलेली विशाल घंटा त्यांनी उचलली. बघतात तर काय ? चिमणी व तिची पिले सुरक्षित होती.
#आजच्या पार्श्वभूमीवर ह्या कथेतून , काय बरे बोध घेता येईल ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment