#अबोली.
कसं कुणी न् कधी बरं हे नाव त्या फुलझाडाला दिलं असावं , कळत नाही. कुंदा , चाफा , मोगरा , शेवंती इत्यादींचे बरेच बरे आहे . ना त्यांच्या नावाचा दुसरा अर्थ ना ज्ञात संदर्भ ! पण अबोली म्हटलं की अबोल कुणी तरी नजरेसमोर येते. अबोली म्हणजे मूक नव्हे. पण भावनांना शब्दातून व्यक्त न करणारी .
तसं पाहिलं तर प्रत्येक कळी , फूल वगैरे अबोलच असतं ना ? मग ह्याच झाडाला अबोली कां बरं म्हणायचे ?
असो , तिच्या जवळ गंध नाही , ना सौंदर्य , ना भारदस्त व्यक्तिमत्व तसं बघितलं तर रंगही जरा फिका , कमी आकर्षक , ना चुटुक केसरी ना गडद भगवा ! तिच्यावरून रंगाचेही नाव पडले ना अबोली !
फुलही असं नाजूक , साधं ना दिसणारा परागकण ना रंगांची मिश्रण ...तरी कुठतरी सोज्वळ न् मुलायम असं हे फूल .. चमेली , मोगरा आदी पांढ-या फुलांच्या संगतीत खुलतं. पण अबोलीची जोडी काटेकोरांटी (पिवळी ) सह जास्त खुलते. तो फिका , हलका केसरी अबोलीचा वर्ण न् सोन्याच्या झळाळीचा काटेकोरांचीचा वर्ण . असा गजरा कोण्या ललनेच्या केशकुंतलांची शोभा वाढवतो वा व्यंकटेशाच्या आरासीचे भूषण ठरतो .
अबोली रंगाची अबोली सामान्यतः सर्वत्र पहायला मिळते. लहानपणी माझ्या माहेरी हिरवी अबोली होती. नाजुक , हलकासा हिरवा रंग . सध्या माझ्याकडे पिवळीजर्द अबोली आहे.
अबोली , काहीही खास नसून खास कसं असावं , ह्याचा वास्तुपाठ देते , होय ना ?
अशी ही अबोली , स्वतः न बोलता समोरच्याला मनोमन बोलतं करते , होय ना ?
या छोट्या ललितलेखासह माझ्या अंगणातील पिवळ्या गर्द अबोलीचा फोटो देत आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

रात राणी कीती छान नाव, पण एखाद राजा नाव असलेलं फुलाच झाड असेल का?
ReplyDeleteहा हा हा...तूच ठेव मग
Delete