Monday, May 1, 2017

#चिंतन

#चिंतन
भारतीय संस्कृती मध्ये 'तीन 'या अंकाला फार महत्व आहे. त्रि>त्रय>तृतीय>ततीय>तीज>त्रिक>तीन
म्हणजे ३.
मधल्या मध्ये "तीन तिघाडा काम बिघाडा" कधी झाले कळलच नाही.
पण तीन हा भारी आकडा आहे.
त्रिदेव =ब्रह्मा- विष्णू-महेश
त्रिकाल=दिवा-निशा-सायम्
त्रिनेत्र =सूर्य-चंद्र-अग्नी
त्रिलोक=स्वर्ग-मृत्यु-पाताळ
त्रिवेणी= गंगा-यमुना-सरस्वती
त्रिदोष=वात-पित्त-कफ
त्रिगुण =सत्व-रज-तम
त्रि-अवस्था =घन-द्रव-बाष्प
त्रिगण= देव-मनुष्य-राक्षस
प्रस्थानत्रयी= उपनिषद्- गीता-ब्रह्मसूत्र
वेदत्रयी=ऋग्वेद-यजुर्वेद-सामवेद
वर्णत्रय=कषाय-शुभ्र-हरित
त्रिफ़ळा= हरितकी-बिभितकी-आमलकी (हिरडा-बेहडा-आवळकठी)
त्रिपिटक= सुत्तपिटक-अभिधम्मपिटक-विनयपिटक
त्रिताप =आधिदैविक-आधिभौतिक-अध्यात्मिक
त्रिमुर्ती= ब्रह्मा-विष्णु-महेश
त्रिपीडा= पत्निपीडा-पुत्रपीडा-संपद्गणनपीडा
त्रिहट्ट=राजहट्ट-स्त्रीहट्ट-बालहट्ट
त्रिदशा=बाल्य-तारुण्य-वृद्ध
त्रिबंध= उड्डियान-जालंधर- मूलबंध
त्रिरत्न= बुद्ध-धर्म-संघ
अजून त्रिके आठवले तर सांगा..
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपुर.




1 comment:

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...