Saturday, March 11, 2017

स्तोत्रचिन्तन : -२

११.३.२०१७

#स्तोत्रचिन्तन  : -२
न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु:
न वा सप्तधातु: न वा पञ्चकोश:
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु:
चिदानन्दरूप: शिवोSहं  शिवोSहम् ॥२॥
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभाव:
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष:
चिदानन्दरूप: शिवोSहं  शिवोSहम्॥३॥
अर्थ-
अर्थाच्या दृष्टीने स्तोत्र सोपेच आहे. अनुभूती कठिण आहे ,प्रतीती सोपी आहे.
मी (फक्त) प्राणसंज्ञक नाही.पंचप्राण प्रसिद्ध आहेत.
श्रोत्र-नेत्र-वक्त्र-घ्राण-मन म्हणजेच प्राण .
पंच वायु म्हणजे मी नाही.
 प्राण-अपान-समान-व्यान-उदान हेच ते पाच वायू जे शरीराला सक्रिय ठेवतात.
शरीराला धारण करणारे तत्त्व म्हणजे धातू. ते सात प्रकारचे आहेत.रस-रक्त-मांस-मेद-अस्थी-मज्जा-शुक्र ,  हे  सात धातू म्हणजे मी नाही.
अन्नमय-मनोमय-प्राणमय-विज्ञानमय-आनंदमय- कोश हेच ते पाच कोश. (आधीच्या चिंतनात यावर सविस्तर लिहिलेय.) हे पाच कोश म्हणजे मी नाही.
वाणी-हात-पाय-जननेंद्रिय-गुदद्वार हे पाच कर्मेंद्रिय म्हणजे मी नाही.
श्लोक एक व दोन मध्ये शरीर-इंद्रियादि अवयव म्हणजे मी नव्हे . हे स्पष्ट केलेय.या सगळ्यांच्या पलीकडे जे चिदानंद रूपी परमतत्त्व शिव आहे ,तेच मी आहे.
आता तिस-या श्लोकात मला षड्रिपु नाहीत आणि चार पुरुषार्थ म्हणजे मी (जीवात्मा) नाही .
द्वेष-राग-लोभ-मोह-मद-मत्सर हे सहा शत्रू म्हणजे नकारात्मकभाव यांच्या पार मी आहे.
तसेच धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार पुरुषार्थ म्हणजे मी नाही.
या श्लोकात शरीराच्या आतील मानवीभावना व मानवी कर्तव्य यांच्या पलीकडे "मी" आहे ,हे सांगितले आहे.
ज्यामुळे मानवी जीवन गुंतागुंतीचे ,तणावाचे होते; त्या नकारात्मकभावना म्हणजे मी नाही .हे समजणे व त्यानुसार वर्तन करणे हे महत्वाचे.
 साक्षात् शंकराचार्यांचा हा श्लोक असल्यामुळे  त्यांत त्यांच्या प्रत्यक्ष अनुभूतीचा  भाग आहे. आपण मात्र "काशीस जावे नित्य वदावे" सारखे मनापासून अलिप्त-तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करावा.
त्याच वेळी  त्या  परमतत्त्वाशी सतत अनुसंधान ठेवावे.
सारखे "चिदानन्दरूप: शिवोSहं  शिवोSहम्" असे मनाला बजावत रहावे.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

1 comment:

  1. This explanation,if explained in hindi as well can benefit lots of seekers.please provide hindi also option of all knowledge that you decide to share.jai ho uh uh

    ReplyDelete

लो लो लागला

  🙏🙏अकरावी माळ 2/10/2025🙏🙏 #श्री रेणुका मातेची आरती. ही आरती देविभक्तां मध्ये प्रसिद्ध आहे. ह्या आरतीचे रचियता तानाजी देशमुख आहेत. त्यां...