आज माझा भाचा घरी आला होता. तो आयुर्वेदाचार्य होतोय (BAMS करतोय ). त्याला अचानक -अनपेक्षितपणे पतंजली आयुर्वेद महाविद्यालय हरिद्बार येथे प्रवेश मिळाला.गेल्या वर्षी हा बारावीत असताना मी त्याला संस्कृत शिकवले होते. याला डॉक्टरच (MBBS) व्हायचे होते.बारावीला "आयुर्वेद" नावाचा धडा आहे .मी तो माझ्यापद्धतीने शिकवला होता. प्रवेश झाल्यावर तो मला भेटायला आला नि आवर्जून सांगू लागला की,तू तो धडा शिकवला ना ,तेव्हापासून मला आयुर्वेदच आवडू लागले. मी ठाम ठरवले की आयुर्वेदच शिकायचे." तशी त्याची तिसरी पिढी आहे आयुर्वेद करणारी.
वीस वर्षांपूर्वी मी आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांना क्लासमध्ये संस्कृत शिकवायचे. माझ्याकडून बारावी शिकलेले अनेकजण आज आयुर्वेदिक वैद्य आहेत. माझे दोन विद्यार्थी आयुर्वेदमहाविद्यालयात प्राध्यापक आहेत. अजूनही कोणी आयुर्वेदातील संस्कृताविषयी अडचण घेऊन आले तर मी तेवढे शिकवते. माझ्या अनेक मुसलमान विद्यार्थ्यांना-ज्यांच्या घरी संस्कृत पार्श्वभूमी नव्हती व ज्यांचे बारावी पर्यंत संस्कृतचे शिक्षणही नव्हते - उत्तम गुण मिळाले संस्कृतात प्रथम वर्षाला. शिकवताना मी कोणताही पूर्वग्रह ठेवत नाही ना भाषेचा आभिनिवेश बाळगत. जे आहे ते त्याच शास्त्रीय पद्धतीने शिकवायचे. समोरच्याला जी भाषा अवगत आहे त्यातून सुरवात करायची व मग शास्त्रग्रंथ उकलायचे. साहेबा ,सॉलेहा ,अब्दुल अजूनही संपर्कात आहेत.
आयुर्वेद प्रथम वर्षाला संस्कृत आवश्यक आहे.
लघुसिद्धांत- कौमुदी ,हितोपदेश,पंचतंत्र ,आयुर्वेदीयसुभाषितानि इत्यादि त्यांच्या अभ्यासक्रमात आहे.
कधीकधी आयुर्वेदीय विश्वात टुम निघते की संस्कृत काढून टाका. पण मुळात संस्कृत व आयुर्वेदाचा समवाय संबंध तोही अयुतसिद्ध (या शब्दांचा अर्थ सांगण्यासाठी स्वतंत्र शब्दचिंतन लिहीन.)असा आहे. सर्व प्राचीन ग्रंथ व टीकाग्रंथ संस्कृतात आहे.त्यामुळे त्याचा पाया तयार करण्यासाठी कौमुदी , मानसिकता तयार करायला सुभाषित नि रूग्णमानसिकता समजण्यासाठी पंचतंत्र आवश्यकच आहे. म्हणून तिथे संस्कृत अनिवार्य आहे.आयुर्वेदाची व्याख्या पुढील श्लोकात दिली आहे.
हिताहितं सुखं दुःखमायुस्तस्य हिताहितम् ।
मानं च तच्च यत्रोक्तमायुर्वेदः स उच्यते ॥
(Life is benevolent or Malevolent. Life is Happiness and Sorrow. That (precept) is called as Ayurveda where that (life), its merit, demerit and dimension is mentioned.) थोडक्यात ,ज्याने जीवन कळते, ते आयुर्वेद.
म्हणजे रोग झाल्यावर दुरुस्त करणे हे आयुर्वेदाचे साध्य नाही . मुळात नीरोगी ,निरामय जीवन जगण्यसाठी आयुर्वेद आहे.
खरेतर संस्कृत तज्ज्ञाहूनही अधिक संस्कृत आयुर्वेदाचार्याला यायला हवे. कारण आजही शास्त्राभ्यासात सखोल विद्वत्ता ,प्रचंड अभ्यासाची गरज आहे. निव्वळ भाषांतरावर तगणारे कुडमुडे-पोटभरू बहु असतील.त्यांच्यामुळे नव्हे तर ख-या विद्याव्रतींमुळे आज जगात आयुर्वेद भूषणीय ठरतोय.
दुर्दैवाने गेल्या हजारोवर्षात भारतीयांची ज्ञान-विज्ञान परंपरा खंडलीय. कॉपीपेस्ट ,सर्च-फॉर्वर्ड यातच कौशल्य मिळवून लोकं समाधानी आहेत.भवभुूति चे सुभाषित कायम स्मरते जेव्हाही "उत्तमाची" उपेक्षा होते.....
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञाम्
जानन्तु ते किमपि तान् प्रति नैष यत्नः
उत्पत्स्यते च मम कोsपि समानधर्मा
कालोSह्य़यं निरवधि: विपुलाश्च पृथ्वी......
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:
Post a Comment