#यशोधरा.
लिच्छवींची कन्या मी लाडाकोडात वाढलेली
शांत सुशील सुंदर तरीही निरागस आणि लाघवी ॥१॥
उपवर होऊन झाले तेव्हा शाक्यांची कुलवधू
सिद्धार्थाची अर्धांगिनी मी सुदैवास कैसे वर्णू ॥ २॥
यशोधरासिद्धार्थाची जोडी अनुपम नि अनुरूप
पाहून दोहोंचे युगल देखणे चराचराला वाटे अप्रूप ॥३॥
शिवसौंदर्याची , ऐश्वर्याची वर्षा बरसे नीत अाता
कपिलवस्तूही तृप्त तेधवा , सौख्याला नसे तोटा ॥૪॥
अशा सुखाच्या वेली वरती फूल उमलले स्नेहाचे
राहूल त्याचे नाव ठेवले प्रतीक तयांच्या प्रेमाचे ॥५॥
सत्य आणिक निर्वाणाचे ध्येय त्याने चेतविले
संसाराची रेशिमबंधने सहज त्याने तुडवीले ॥६॥
काय बिनसले , नजर लागली कशी नकळे संसारी
माया समजून सिद्धार्थाने सोडून दिधले अधांतरी ॥ ७॥
गौतम सिद्धार्थाचा झाला जगासाठी भगवान बुद्ध
शाक्यवधू ,पुत्रवती मी कशी त्यजू पत्नीपदा शुद्ध ॥८॥
जगास दाखवून मध्यममार्ग तू उद्धरले चराचरा
सप्तजन्मीची सहचरिणी मी काय दोष माझा ?।९॥
निर्वाणास्तव सर्व जगाच्या जन्म तुझा झाला
साधन आणि साधना माझी तूच तूच झाला ॥१०॥
राजकुलवधू ,यशोधरा मी परित्यक्ता जाहली
प्रवज्जित अहा राहुल होता राजमातृपदा मुकली ॥११॥
जन्म माझा केवळ झाला त्यागमूर्ती व्हावया
यशोधरा ही कारण झाली बुद्ध घडविण्याला ॥१२।।
सर्व जगाचा तथागत तू , गतानुगतिका मी
असो सुखाचा बुद्ध जगाचा यशोधरेचा पती ॥१३॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:
Post a Comment