Saturday, May 16, 2020

सहजोक्त

#कविता= वेदना
 वेदना आणिक अश्रू , सर्जनाची साधने ।
 उत्तमातील उत्तमाच्या निर्मितीची कारणे ॥
 अंतरीची वेदना जी हृदयी मीरेच्या उपजली ।
कृष्णभक्तीच्या रूपाने वाणीतुनी अोथंबली ॥
 वेदना शिरली उरी त्या गौतमाच्या तेधवा
अहिंसा आणिक समता नांदती जगती पहा ॥
ज्ञानदेवाच्याही झाली वेदनांची परिसीमा ।
वर्षिला कारुण्यपान्हा पसायदानरूपी अहा ॥
गाथा तुक्याची वेगळी कां वेदनेची मूर्ती जी ।
चराचराच्या संवेदनांची जणू स्पंदने हो जागती ॥
वेदनांची ढाल करुनी वार छातीवर झेलतो
 मायभूमी रक्षिण्याला वीर तो बलिदान देतो ॥
 वेदना परदास्यामुळे भाळी बळे जी लादली  ।
 वाग्यज्ञ दाहक पेटविला त्वाचि रे विनायकी ॥
  हीच ईशा विनवणी की वाहती दे वेदना ।
  फुलविण्या आनंद जगती जागवी संवेदना ॥
  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment