*पीनो देवदत्तः दिवा न भुङ्क्ते।*
लठ्ठ देवदत्त दिवसा जेवत नाही. शास्त्रग्रंथांमध्ये (न्याय-वैशेषिक-सांख्य) हे वाक्य सामन्यपणे वाचायला मिळते. अर्थापत्तीचे उदाहरण म्हणून या वाक्याचा उपयोग करतात. ज्या अर्थी देवदत्त दिवसा जेवताना दिसत नाही तरीही लठ्ठ आहे म्हणजे तो रात्री भरपूर जेवतो , हा सरळ तर्क आहे.
वरील वाक्य प्रतिनिधिक आहे.
पैशांचा अपहर न करणारे (कोट्याधीश) , एकपत्नीत्व निष्ठेने पाळणारे (अनेक मानलेल्या राधा असणारे) , अतिशय कर्तव्यकठोर (कोणत्याही मार्गाने हवे ते पदरात पाडून घेतल्यावर) , सत्यासाठी झगडणारे (त्यांच्या सोयीचे सत्य) असे नाना प्रकारचे देवदत्त (आणि हो ,देवदत्ती सुद्धा <महिला समानता>) अवती भवती सुखाने वावरत असतात.
आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या स्तराचे अनेक देवदत्त अनुभवायला मिळतात.
आठवा बरे तुम्ही , तुमच्या माहितीतील देवदत्त ,
अन् *पीनो देवदत्तः दिवा न भुङ्क्ते।* या उदाहरणाची सत्यता पडताळून पहा.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment